कोरोना चे ३६ रूग्ण आढळुन कन्हान एकुण ११५ रूग्णानी झाले सनान

पहिलेचे ७९ व ३६ रूग्ण आढळुन कन्हान व परिसरात ११५ रूग्ण.

कन्हान ता.प्र.दी.३०: – कोरोना संसर्ग रूग्णाची दिव सेदिवस संख्या वाढुन (दि.२८) ला २७ लोकांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल (दि.३०) ला सकाळी प्राप्त होऊन त्यात कन्हान ६ व कांद्री ३ असे एकुण कन्हान चे नऊ रूग्ण पॉझीटिव्ह आले. प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे कांद्री येथे ८७ लोकां ची रॅपेट तपासणी घेण्यात आली. यात जवाहर नगर, गुरफुडे लेआऊट, सत्रापुर कन्हान येथील १९ व कांद्रीचे ८असे एकुण २७ रूग्ण पॉझीटिव्ह आढळल्याने गुरूवार (दि.३०) ला एकुण ३६ रूग्ण
आढळुन आल्याने स्थानिय प्रशासनाची चांगलीच धावपळ होत चांगलीच तारांब ळ उडाली. (दि.२९) पर्यंत ७९ रूग्ण व आज गुरूवार (दि.३०) ला सायंकाळ पर्यंत कन्हान २५ व कांद्री ११ असे ३६ रूग्णमिळुन एकुण ११५ रूग्ण संख्या होत शतक पार केले.यात कन्हान ७८, पिपरी – ६, कांद्री – २२, टेकाडी कोळसा खदान – ७ व बोरडा (गणेशी) – १, मेंहदी -१ असे कन्हान शहर, ग्रामिण एकुण ११५ रुग्ण संख्या झाली. कन्हान शहर पिपरी मिळुन ८४रूग्ण आढळुन कोरोना रूग्ण संख्येचे शतक पार झाल्याने शहरा त व परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *