कामठी तालुक्यात मुलांपेक्षा मुली सरस तालुक्याचा निकाल ९३.६२ टक्के

कामठी,ता २९ जुलै :-.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पहिली पायरी समजली जाणारी महाराश्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २० ला घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेमध्ये कामठी तालुक्याचा निकाल ९३.६२ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत (६८.१५) पंचवीस टक्यांनी जास्त लागला आहे. तालुक्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याने मुलांपेक्षा मुली सरस ठरल्या आहेत. तालुक्यातील बारा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून मागील वर्षी फक्त दोन शाळांनी गाठली होती.
      कामठी तालुक्यातील ४० शाळांमधून १५१४ मुले व १२९४ मुली असे एकूण २८०८ विघार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी १३८३ मुले (९१.३५) व १२४६ मुली (९६.२९) एकूण २६२९ विद्यार्थी (९३.६३) उत्तीर्ण झाले. मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण गत वर्शी प्रमाणे जास्त आहे. तालुक्यातील कामठी शहरातील रामकृष्ण शारदा मिशन स्कूल ऑफ होम सायन्स, सेठ रामनाथ लोईया, सरस्वती शिशु मंदिर तर आयडियल काॅन्हवेंट गुमथळा, आदर्श विद्यालय  गुमथळा(गुमथी), गुरूकुल पब्लिक स्कुल वडोदा, एम. एन.एम. ब्राईट स्कूल येरखेडा, विवेकानंद विद्यालय पळसाट, टेमसना माध्यमिक विद्यालय टेमसना, राजीव विद्यालय जाखेगाव, भोसला मिलीटरी स्कुल पंचवटी कोराडी, भांगे पब्लिक स्कूल कोराडी या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. असून तालुक्यात ७०५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी तर ९५९ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली.      तालुक्यातील कामठीच्या सेंट जोसेफ काॅन्हवेंट हायस्कुल (९९.२५), हरदास हायस्कूल (७४.४१), हाजीयानी खतीजाबाई गर्ल्स हायस्कुल (९९.०३), , नूतन सरस्वती गर्ल्स हायस्कूल (९०.७७), एम.एम. रब्बानी हायस्कूल (९२.८१),नूतन सरस्वती बाॅईज हायस्कुल (८१.१९), सेठ कल्लनमियाॅ अंसारी हायस्कुल (९०.६२), देशभक्त रत्नप्पा कुंभार विद्यालय (८२.४५), शिक्षक सहकारी माध्यमिक शाळा (७२.९१), मास्टर नूर मोहम्मद (९६.८७), इंदिरा हायस्कुल. (७३.३३), अविनाश हायस्कुल (७८.५७), हरदास हायस्कुल (७४.४१), कोराडीच्या प्रागतिक माध्य.विद्यालय (९४.४७), अश्र्वीनी माध्यमिक विद्यालय बिना (९६.१५), तेजस्विनी माध्यमिक विद्यालय(९७.७०), पद्मश्री स्मिता पाटील कन्या विद्यालय महादुला (९४.११), सेवानंद विद्यालय महादुला, (९०.३२), लोणखैरी माध्यमिक विद्यालय लोणखैरी (७८.५७), अॅड. दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी (९०), प्रकाश हायस्कुल गुमथळा (९८.८३), ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय पावनगाव (८३.३३), अॅड. दादासाहेब कुंभारे माध्यमिक विद्यालय खसाळा (८५.१८), प्रियांती पब्लिक स्कुल तरोडी (९४.९१), गांधी विद्यालय वडोदा (९१.७६), शासकिय अनुसुचित जाती नवबौध्द निवासी आश्रमशाळा वारेगाव (९५.६५), स्वं. राजीव गांधी हायस्कुल सुरादेवी (९२.८५), श्रीनाथ विद्यालय महालगाव (९१.०७), स्नेही विकास विद्यालय भुगाव (९५.३१), भिलगाव माध्यमिक विद्यालय भिलगाव (९२) असा निकाल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *