नागपूर दिनाक २९ : जिल्हयात तसेच शहरात रक्षा बंधन व ईद या काळात लॉक डाऊन लागू करण्या संदर्भात समाज माध्यमावर अत्यंत चुकीची माहिती शेअर होत आहे, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात कोणतीही बैठक झाली नाही, जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे,
समाज माध्यमावर अत्यंत चुकी चा व जनतेची दिशाभूल करणारी माहिती पासर विणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे, सायबर सेल मार्फत संपूर्ण चौकशी करून अशा अफवा पसरवून भितीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे