मौदा २८ जुलै ता:- दिनांक २७ जुलै ला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पावडदौना येथे युवासेना मौदा तालुका च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सिल्ड (ट्रॉफी), मेडल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शिवाय अनेक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी नितेश वांगे युवासेना मौदा तालुका प्रमुख, उद्घाटक निळकंठजी भोयर, प्रमुख उपस्थिती गणेश तिवाडे शिवसेना शाखा प्रमुख, विमलताई गेडेकार* माजी ग्रा.पं.सदस्या, ज्ञानेश्वर भोयर बूथ प्रमुख, बंडूजी तिवाडे, अतुल भोयर,मनोहर देशमुख, अमित तिवाडे,रुपचंद वैद्य, रामा सहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सुजाता तिवाडे,होशिका गेडेकार,कांचन भोयर,पूजा शेंडे,रुपेश भोयर,सिद्धू शेंडे,अविनाश हटवार, राकेश बोरकर,हर्षल गेडेकार व अनेक विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन युवासेना शाखा प्रमुख स्वप्नील भोयर यांनी केले व आभार अभिषेक बडे
यांनी मानले.