कन्हान ला कोरोनाचे चार रूग्ण आढळुन एकुण ६६ संख्या

खाजगी ०२ व आरोग्य केद्राच्या तपासणीत ०२ पहिलेचे ६२ मधुन १० घरी परत आले.

कन्हान ता.प्र.दी.२७ : – सुरूवातीच्या लॉकडाऊन काळात लोहिया लेआऊट कन्हान एक व संताजीनगर कांद्री येथील म्हतारा एक असे दोन पकडल्यास दि.२६ पर्यत ६२ म्हणजे अर्ध शतक पार केले असुन यात म्हतारा व भाजीपाला वाला या दोघाचा मुत्यु झाला आहे. (दि.२७) ला प्राथमिक आरोग्य केंद्रा व्दारे केलेल्या ३२ वैद्यकीय तपासणीत सत्रापुर व जवाहर नगर कन्हान ०२ पॉझीटिव्ह व ३० निगेटिव्ह आले. तर खाजगी तपासणीत पटेल नगरचे दोन रूग्ण आढळल्याने अगोदरचे ६२ व आज ०४ असे एकुण कन्हान ६६ रुग्ण संख्या झाली. यात कन्हान ४३, पिपरी – ५, कांद्री – १०, टेकाडी कोळसा खदान – ७ व बोरडा (गणेशी) – १ असे कन्हान शहर व ग्रामिण मध्ये एकुण ६२ रुग्ण संख्या झाली. यात १० रूग्ण सुख रूप घरी परत आले असुन कोरोना संस र्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढुन थांबता थांबत नसल्याने नागरिकांनी स्वत:ची, कुंटुबाची व शहराची काळजी घेऊन सरकारच्या प्रतिबंधात्मक उपाय, नियत्रक, नियमाचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनावर मात करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *