मौदा ता प्र। देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या पर्शवभूमीवर मागील चार महिन्यापासून देशात लोकडाऊन सुरू आहे मागील काही दिवसात ग्रामीण भागात पण कोरोना चा शिरकाव झाला त्यावर प्रतिबंध लावण्याच्या पोलीस विभाग महसूल विभाग या प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करीत आहे आज मौदा तालुका हा औदयोगिक तालुका म्हणून ओळखला जातो एकीकडे देशात कोरोनाच्या रुग्णाची वाढ होत असताना मौदा तालुक्यातील प्रशासन यंत्रणा कामाला लागली शहरात अनेक परप्रांतीय लोक वास्तव्याला होते त्यामुळे प्रशासनाची काळजी वाढली होती पण मौदा तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी पोलीस विभाग नगरपंचायत स्थानिक सामाजिक कार्येकर्ते राजकीय नेते यांच्याशी योग्य समनव्य करून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या प्रत्येक ग्रामपंचायवत प्रशासन आरोग्य विभाग यांच्या समपर्कात राहून प्रत्येक गावाची माहिती घेत होते बरेच दा त्यांना त्यांच्या कार्यालयातच रात्र काढावी लागली आजही कोरोना विलगिक रण कक्षात जाऊन भेटी देने रुग्णाची विचारपूस करणे त्यांना धीर देने हे त्याचे दैनंदिन कार्य आजही सुरू आहे या कार्यात आपल्याला सहकारी कर्मचारी पोलीस विभाग आरोग्य विभाग राजकीय नेते पत्रकार नगरपंचायत प्रशासन यांचे पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे सांगळे यांनी सांगितले ऱ्यामुळे मौदा तालुक्याच्या दृष्टीने ते खरे कोरोना योद्धे ठरले आहे