कन्हान ता.प्र.दी.२६ : – ग्रामिण पत्रकार संघ कन्हान ची कार्यकारणीची बैठक घेऊन सर्वानुम ते अध्यक्ष रमेश गोळघाटे, सचिव सुनिल सरोदे यांची निवड करून नविन कार्यका रणी घोषित करण्यात आली.
ग्रामिण पत्रकार संघ कार्यालय रेंघे भवन तारसा रोड कन्हान येथे जिल्हाध्य क्ष राकेश मर्जिवे यांच्या आदेशाने जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे च्या मार्गदर्शना त कार्यकारणीची बैठक घेऊन सर्वानुमते अध्यक्ष म्हणुन रमेश गोळघाटे, कार्याध्य क्ष अजय त्रिवेदी, सचिव सुनिल सरोदे, उपाध्यक्ष कमलसिंह यादव, कोषाध्यक्ष रविंद्र दुपारे, मार्गदर्शक एन एस मालविये सर, मोहन रंगारी, मोतीराम रहाटे, सदस्य शांताराम जळते, गणेश खोब्रागडे, रवि कोचे, रोहित मानवटकर, गणेश मस्के, ऋृषभ बावनकर आदीची निवड करण्या त आली. नविन अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिव यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुर्ण कार्यकारणीस जनहितार्थ व समाजोपयोगी पुढील यशस्वी वाटचाली स शुभेच्छा दिल्या.