रामटेक २२ जुलै :- रामजन्मभूमी अयोध्या येथे ५ आँगस्टला भव्य मंदिर निर्माण कार्याचा शुभारंभ पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यानिमित्ताने रामटेकच्या श्रीराम मंदिरात प्रभु रामचंद्राच्या चरणाची अभिषेक केलेली माती अयोध्यतील मंदिरनिर्माणाच्या पायाभरणी करिता रवाना झाली आहे.
यासाठी दि.२३ जुलै ला सकाळी १०:३० वाजता रामंदीर परिसरात अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सद्याच्या शासकीय नियमानुसार मंदीर बंद असल्यान कार्यकर्तेे मंदिरात जाऊ शकले नाहीत .
तरीसुधा मंदिराच्या पायरीवर दर्शन घेऊन प्रमुख कार्यकर्ते माती घेऊन अयोध्या प्रस्थान करण्यास निघाले.
या ऐतिहासिक मंगल प्रसंगी सर्व शासकीय नियमांचे पालन करून रा.स्व.संघ नगर संघचालक अँड.मा.किशोरजी नवरे, नगर कार्यवाह मुकेश भेंडारकर,विजय लांडगे.जिल्हा प्रचारक सागरजी आहेर,वि.हिं.प चे जिल्हा सहमंत्री मंगलप्रसाद घुगे, उपाध्यक्ष अनिल कंगाली.कोषाध्यक्ष मोहनराव काटोले,जिल्हा संघटनमंत्री राजुबाबा कवरे,विद्याभारती पुर्व विदर्भ प्रमुख महेश सावंत, राम व्यवहारे,राम सावंत,सांची सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.