कुही -२२ कुही तालुक्यातील सील्लीनंतर देवळी कला येथे सोमवारी २०/७/२०२०ला एक रुग्ण कोरोना पाँजीटीव्ह आढळला. त्यानंतर त्याच्या संपर्कातील सात जनाना कुही येथे क्वारंटाईन करण्यात आले होते त्यांची तपासणी केली असता त्यातील एक महीला पाँजीटीव्ह असल्याचा रिपोर्ट आला असुन तालुक्यात भिती चे वातावरण पसरले आहे.
सोमवारी देवळी कला येथील पहीला व तालुक्यातील दुसरा पेशंट आढळताच संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली होती तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनाने आपापल्या गावाचे सुरक्षेचे दृष्टीने उपाययोजना सुरु केल्या आजच मांढळ येथे तहसिलदार बाबाराव तीनघसे यांचे नेतृत्वात रुट मार्च काढण्यात आला.
आता पुन्हा एक महीला देवळी कला येथे पॉझिटिव्ह नीघाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.गटविकास अधिकारी मनोज हीरूडकर व तालुका आरोग्य अधिकारी डा संजय निकम यांचे मार्गदर्शनात साळवा प्राथमिक आरोग्य केंद्र चे आरोग्य अधिकारी व कर्मचारी, देवळी कला येथील शीक्षक व अंगणवाडी सेविका व आशा वर्कर हे रात्रंदिवस काम करीत असल्याचे ग्रामसेवक जयेंद्र सोळंकी यांनी सांगितले .
कुही -देवळी कला येथे कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.