ग्रा प गोंडेगाव तर्फे आंगण. सेविका, आशा वर्करना सुरक्षा साहित्य वाटप

कन्हान ता.प्र.दी.२३ : – गोंडेगाव येथे कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावात आंगण वाडी सेविका व आशा वर्कर महत्वाचे कार्य करित असल्याने ग्राम पंचायत गोंडे गाव व्दारे सरपंच नितेश राऊत, उपसरपं च सुभाष डोकरीमारे यांच्या हस्ते तीन अंगणवाडी सेविका व दोन आशा वर्कर करिता सनकोट, हॅंडग्लोब, टेम्परेचर गण , पल्स ऑक्सिमीटर, सेनेटाईजर, मास्क आदी सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ग्रा प सदस्य सौ. ललीता पहाडे,सौ.निर्मला सरवरे, मोरेश्वर शिंगणे, आकाश कोडवते, सौ यशोदा शेंदरे, सौ रेखा काळे, सौ पुजा रासेगावकर, सौ आशिमा वासनिक,सुनिल धुरिया, कुणाल मधुमटके व कर्मचारी संजय मेश्राम उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *