कन्हान ला ११ रूग्ण आढळुन कोरोना विस्फोट

कन्हान एकुण ४१ रूग्ण, एकाचा मुत्यु.

कन्हान ता.प्र.दी.२२ : – कामठीवरून कन्हान ला शिरकाव झाला तरी येथील प्रशासन जागे न झाल्याने आठव्या दिवसी रात्री एका भाजीपाला वाल्याचा मुत्यु होऊन आठव्या दिवसी एकुण २८ संख्या, नऊ व्या दिवसी ऑटोवाला व निरंतर सर्वेती ल १ असे दोन रूग्ण आढळुन ३० संख्या झाली. आज (दि.२२) ला कांद्री येथे ७५ लोकांच्या वैद्यकीय तपासणीत भाजीपा ला वाल्याच्या संपर्कातील पटेलनगर कन्हानचे ९ व कन्हान १ आणि कांद्रीची १ महिला असे ११ रूग्ण आढळुन आ ल्याने कन्हान ला कोरोना रूग्णाचा विस्फोट होत एकुण ४१ रूग्ण संख्या होऊन एका भाजीपाला वाल्याचा मुत्यु झाला. यात कन्हान -२०, पिपरी – ५, कांद्री – ८, टेकाडी कोळ सा खदान – ७ व बोरडा(गणेशी) -१ असे कन्हान शहर व ग्रामिण मध्ये एकुण ४१ संख्या होत एक मुत्यु झाल्याने कन्हान कोरोना विस्फोटक होत असल्याने ही वाढती साखळी तोडण्याकरिता कन्हान ला कमीत कमी १० दिवसाचा कडक जनता कर्फुची मागणी ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व विविध सामाजिक संघटना, संस्था आणि नागरिका व्दारे जोर धरू लागली आहे.
सर्दी, खोकला, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास नागरिकांनी कोरोना ची मोफत तपासणी मुकबधीर विद्यालय कांद्री येथे करून घ्यावी. डॉ प्रशांत वाघ
कोविड-१९ ची वैद्यकीय तपासणी मुकबधीर विद्यालय कांद्री येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत वाघ, कन्हान वैद्यकीय अधिकारी योगेश चौधरी, सुरेंद्र गि-हे, अजय राऊत, गौरव भोयर, श्वेता मेश्राम, लॅब टेकनीशियन शारदा जोगळेकर आदी परिश्रम करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *