कन्हान ता.प्र.दी २१ : – कोविड-१९ चा प्रादुर्भाव दिव सेदिवस कन्हान ला वाढुन रूग्ण संख्या वाढुन ३० होऊन एका भाजीपालावाल्या चा मुत्यु झाल्याने एकाएक राज्याचे गृह मंत्री मा अनिल देशमुख व पालकमंत्री नितीन राऊत हयानी भेट दिल्याने येथील अधिकारी व कर्मचारी जागे होऊन नाग रिकांच्या सुरक्षेच्या दुष्टीने कार्य करतील का? या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कामठीच्या संपर्कातुन कन्हान ला कोरोना रूग्णाचा शिरकाव होत एका आठवडयात२८ रूग्ण ज्यात एका भाजी पाल्यावाल्याचा मुत्य झाला. (दि.२१) ला कांद्री येथील वैद्यकीय तपासणीत एक ऑटोवाला आणि निरंतर सर्वेतील एक असे दोन रूग्ण आढळुन एकुण रूग्ण संख्या ३० होताच राज्याचे गृहमंत्री मा ना अनिलबाबु देशमुख व जिल्हाचे पाल कमंत्री मा ना नितीन राऊत हयानी कन्हान पोलीस स्टेशनला भेट देत कुणालाही न भेटता सिहोरो रेती घाट पाहण्या करिता गेल्याचे कळले. कन्हान येथील प्रशासनाची ढिल असल्याने कोरोना रूग्णाची वाढती संख्या पाहता या दौ-या नतर येथील प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेच्या दुष्टीने कर्तव्य बजावतील का? याकडे कन्हान वासीयांचे लक्ष लागले आहे.