गोंडेगाव खदानचा नाला फुटुन शेत माती जलमयाने शेतीचे नुकसान

कन्हान ता.प्र.दी.१९ : – वेकोवि गोंडेगाव खुली कोळ सा खदान माती डम्पींग लगत पाणी नि कासी नाला फुटुन शेत माती व जलमय होऊन शेतपीकाचे भयंकर नुकसान होऊ न शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने वेकोलि गोंडेगाव प्रशासनाने त्वरित नुक सान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान माती डम्पींगमुळे मोठमोठया कृतिम टेकडया निर्माण होऊन या खदान परिसराचे पाणी निकासी करिता वेकोली व्दारे तयार करण्यात आलेला नाला छो टा व व्यवस्थित नसल्याने पाऊसामुळे डम्पींगची माती, पाण्यासह वाहत अस ल्याने नाला फुटुन शेतात शिरून पराटी (कपाशी), तुर, धान, भेंडी आदीचे पिक पाखन माती व पाण्याखाली डुबुन जलम य होऊन शेतकरी मोरेश्वर शिंगणे, शोभा शिंगणे, निखिल शिंगणे, विष्णु लांडगे, केलास लांडगे, संजय लांडगे, कैलास शिंगणे, अनिल छानिकर सह इतर शेतक -याचे शेतपिकाचे मोठया प्रमाणात नुक सान झाले आहे. हाच नाला २०१८ ला सुध्दा फुटुन या शेतक-यांचे झालेले नुक सान कृषी व तहसिल कार्यालयाने अहवा ल वेकोलि ला पाठविला परंतु अद्याप नुकसान भरपाई न दिल्याने शेतकरी संतापले आहे. या शेतपिक नुकसानीची श्री भोसले तलाठी, श्री वाघ तालुका कृषी अधिकारी हयानी मौका चौकसी करून तहसिल कार्यालयास अहवाल सादर करणार आहे. गोंडेगाव सरपंच नितेश राऊत व घाटरोहणा सरपंचा सौ मिनाक्षी बेहुणे हयानी वेकोलि गोंडेगाव खुली कोळला खदान व्दारे नुकसान ग्रस्त शेतक-यांना त्वरित नुकसान भरपा ई देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *