मा प्रकाशभाऊ जाधव व्दारे आरोग्य केंद्र व पोलीस स्टेशनला साहित्य भेट

कन्हान ता.प्र.दी.१७ : – शहरात कोरोना विषाणु संस र्गाची वाढती संख्या लक्षात घेत माजी खासदार मा. प्रकाशभाऊ जाधव हयानी पोलीस स्टेशन व आरोग्य केंद्र येथील कार्यरत अधिकारी, कर्मचा-याच्या सुरक्षे करिता फेस मॉस्क, सॅनिटाईझर लिकवी ड, मॉस्क व इतर प्रतिबंधक साहित्य भेट म्हणुन दिले.
या चार दिवसात कोरोना संसर्गाची कन्हान शहर व परिसरात वाढती संख्या पाहता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता दिवस रात्र कार्य करणा-या पोलीस व आरोग्य कर्मचा-याच्या सुरक्षेच्या दुष्टीने कन्हान रहिवासी शिवसेना रामटेक लोक सभेचे माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव व्दारे कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार अरूण त्रिपाठी व प्राथमिक आ रोग्य केंद्र कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी, डॉ प्रज्ञा गोडाणे हयांना फेस मॉस्क, सॅनिटाईझर लिकवीड, मॉ स्क आदी प्रतिबंधक साहित्य भेट देऊन आपण व आपल्या सहकारी कर्मचा-यांची काळजी घेत हा लढा प्रामाणिक पणे लढल्यास नागरिकांना सुरक्षा प्रदान करित कोरोना वर आपण मात करू शकु अश्या प्रकारे कोरोना योध्दाचे मनोबल वाढवुन त्याचे अभिनंदन केले. याप्रसंगी ग्रामिण पत्रकार संघ अध्यक्ष मोतीराम रहाटे, सचिव रमेश गोळघाटे, सतिश साळवी, दुकानदार संघाचे सचिन गजभिये, अरविंद देशमु़ख, दिलीप राईकवार, सचिन साळवी, जितु पाली, गौरव भोयर, आकाश चिखले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *