महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाच्या परीक्षेत कामठी फार्मसी महाविद्यालयाच्या नीकाल १००%

कामठी ता.प्र.दी.१७:- कोव्हिड-१९ च्या पादुर्भावामूळे व त्या अनुषंगाने झालेल्या ताळेबंदी मुळे शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षा नियमावलीनुसार अंतिम वर्ष वगळून प्रथम वर्षातील नियमित विद्यार्थ्यांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. ज्यात प्रथम वर्ष औषधी निर्माण शास्त्र पदविका (डी.फार्म.) अभ्यासक्रमात श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था कामठी द्वारा संचालित श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी या महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.दी.१४ जुलै २०२० ला मंडळाने हा निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन घोषित केला. ज्यात पुन्हा एकदा कामठी फार्मसी महाविद्यालय १०० टक्के निकाला सह संपूर्ण विदर्भात अव्वल ठरले.
कामठी फार्मसी महाविद्यालय हे मागील २३ वर्षापासून औषधनिर्माणशास्त्र पदवी, पदवीत्तर पदवी तसेच पदविका अभ्यासक्रम राबवित आहे. अत्यंत अल्प कालावधीत औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात या महाविद्यालयाने मध्य भारतात अत्युच्च प्रगती केलेली आहे.पदवीका,पदवी,पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमाबरोबर हे महाविद्यालय आता संशोधन व विकासाच्या क्षेत्रात संपूर्ण मध्य भारतात एक अग्रेसर म्हणून गणल्या जात आहे.
महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या सौरभ पिल्लारे ९२.२७, कु. प्रांजली रघुते आणि अमर येसनकर ९१.०९ तसेच गजानन शिरगिरे ८९.८२ टक्के गुण संपादन करुन क्रमश: प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावून महाविद्यालयास उंच शिखरावर पोहोचविले.
यापूर्वीही महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर, महाराष्ट्रात, विदर्भात तसेच विद्यापीठात अव्वल स्थान प्राप्त केलेले असून या महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विदेशात उच्च शिक्षणाकरिता व बहुराष्ट्रीय औषधी कंपन्यांमध्ये नोकरीकरिता स्थायी झालेले आहेत. अत्यंत अल्प कालावधीत झालेली महाविद्यालयाची प्रगती ही खरोखरच मध्य भारतात सर्वत्र प्रशंसनीय आहे.
कोव्हिड-१९ सारख्या लॉकडाउनच्या काळात परीक्षेकरिता कामठी फार्मसी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकरीता उपलब्ध असलेल्या ICT विभाग आणि स्थापित ई-स्टुडिओ च्या माध्यमातून सातत्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अतिरिक्त वर्ग, शिक्षकांचे ध्वनिमुद्रित शिकवणी, ऑनलाइन सेमिनार द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद उमेकर यांच्या देखरेखीत सर्व अत्याधुनिक व्यवस्थापन यामुळे शक्य संपादन करता आले. असे उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती किशोरीताई भोयर, सचिव श्री सुरेश भाऊ भोयर त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद उमेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्य करिता शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *