रेती चोरून नेताना दोन ट्रक पकडले दोन ट्रक मध्ये नऊ ब्रास रेती १६ लाख१८ हजारचा मुद्देमाल जप्त.

कन्हान ता.प्र.दी.१७ : – वाघोली शिवारात एका दहा चाकी ट्रक म़ध्ये ४ ब्रॉश रेती व बंद टोल नाका जवळ दुसरा ट्रक मध्ये ५ ब्रॉश रेती अवैद्यरित्या चोरून नेताना तहासिलदार सहारे यांचे मार्गदर्शनात मंडळ अधिकारी मेश्राम यांनी पकडुन दोन ट्रक सह नऊ ब्रास रेती असा १६ लाख१८ हजार रू. चा मुद्देमाल जप्त केला. आठ दिवसात महसुल विभागाची दुसरी कार्यवाई.
सुत्राच्या गुप्त माहीतीवरून गुरूवार (दि.१६) दुपारी ४ वाजता दरम्यान पार शिवनी तालुक्यातील नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर बंद टोल नाका जवळ विना परवाना अवैधरित्या चोरीची रेती दहा चाकी ट्रक क्रं एमएच ४० ऐके ४५२५ मध्ये ४ ब्रॉश चालक राजु बनकर वय २६ वर्ष रा. म्हाळगीनग र नागपुर तर दुसरा ट्रक क्रं एमएच ४० वाय ९७७२ मघ्ये ५ ब्रॉश रेती चोरून नेताना चालक राजेश कारदास शिगांड़े वय ४८नवर्ष रा.पारडी,नागपुर वाघोली शिवारात असे दोन ट्रक तहासिलदार वरूणकुमार सहारे यांचे मार्गदर्रशानात कन्हान मंडळ अधिकारी जगदिश मेश्राम यानी पकडुन दोन ट्रक किंमत १६ लाख व नऊ ब्रॉश रेती १८ हजार असा अदाजे एकुण १६ लाख१८ हजारचा मुद्देमाल जप्त करित पंचनामा करून कन्हान पोलीस स्टेशन ला जप्तीनामा देऊन सुपुद केला. पारशिवनी तहसिल महसुल विभागाने आठ दिवसात दुसरी कार्यवाई करून शासनाचा गौणखनिज व महसुल वाचविल्याने नागरिकांन व्दारे अधिका-यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *