मौदा ता प्र:- मागील काही दिवसात मौदा शहरातील अर्जुनगर प्रगतीनगर शिवनगर या वस्तीत दुकारांचा मुक्त संचार वाढल्यामुळे वस्तीरील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पण नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वस्तीतील नागरिकांनी केला आहे या वस्त्यांमध्ये अनेक भूखंड खाली असून पावसाळ्याच्या दिवसात या भूखंडाच्या खोलगट भागात पावसाचे पाणी संचयन होते तसेच त्या ठिकाणी पाणथळ वनस्पती आणि गवताचे झुडपे तयार झाल्यामुळे डुकराचे निवास स्थान बनले आहे वरील प्रकारामुळे या वस्त्यात साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे मागील काही वर्षांपूर्वी मौदा शहरात डुकराचे हैदोस मोठ्या प्रमाणात होता परंतु तत्कालीन मुख्याधिकारी श्री रमाकांत डाके यांनी विविध उपाययोजना करून मौदा शहर वराह मुक्त केले होते परंतु मागील दोन महिन्यांच्या काळात मौदा शहरात पुन्हा विविध वस्त्यात या डुकराची संख्या वाढताना दिसत आहे यावर नगर पंचायतीने त्वरीत प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे अन्यथा ही समस्या आणखी बिकट होण्याची शयकेता जास्त आहे त्यामुळे आज मौदा शहरात वाढत असलेली डुकराची संख्या मात्र स्वछ सुंदर आणि पुरस्कार प्राप्त मौदा शहराला लागलेले ग्रहण आहे असे म्हणणे वावगे होणन नाही .