कन्हान ता. प्र.दी.१० : – पोलीस स्टेशन अंतर्गत पार शिवनी तालुक्यातील कन्हान नदीच्या सिहोरा रेतीघाट शिवारात एका ट्रक मध्ये सह पाच ब्राश रेती अवैधरित्या भरून चोरून नेताना महसुल विभागाचे कन्हान मंडळ अधिका-यानी पकडुन ६ लाख १० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त कर ण्यात आला. ट्रक चालक पसार झाला. सुत्राच्या गुप्त माहीतीवरून शुक्रवार (दि.१०) जुलै ला सकाळी ११ वाजता दरम्यान कन्हान नदीच्या सिहोरा रेती घा टावरून बिना परवाना अवैधरित्या चोरी ची रेती भरून नेताना बंद टोलनाका जव ळ तहसिलदार वरूणकुमार सहारे यांचे मार्गदर्शानात कन्हान मंडळ अधिकारी जगदिश मेश्राम यानी ट्रक चालक पिलाजी बागडे वय ४७ वर्ष रा. खेकळा नाला ता. सावनेर ला दहाचाकी ट्रक क्र एम एच ४० ए के ६४३८ किंमत सहा लाखाचा ट्रक अवैद्यरित्या ५ ब्रॉश रेती १० हजार रूपये असा अदाजे ६ लाख १० हजार रूपयाचा मुद्देमाल पकडुन पंचनामा करून पोलीसाना जप्तीनामा देऊन सुर्पुद केला. ट्रक चालक घटनास्थ ळा वरून पसार झाला. यावर पुढील दंडात्मक कारवाई तहसिलदार पारशि वनी यांच्या आदेशान्वये करण्यात येईल.