नविन कामठीच्या डि.बी.पथकातील कर्मचार्‍यानी १२ गौंवश जनावर्‍यांना दिले जिवनदान

कामठी ता.प्र.दी.१०:-कामठी प्राप्त माहीतीनूसार दि.१०/७/२०२० रोजी चे राञी १२.०० सु. नविन कामठीच्या डि.बी पथकातील कर्मचारी पो.हवा.पप्पू यादव व मंगेश लांजेवार,मंगेश यादव,राजेद्र टाकळीकर,सुधिर कनोजिया,उपेन्द यादव तसेच संदीप भोयर हे रंगारी डाबा जवळील समोरील हायवे रोड कामठी या भागात गस्त घालीत असता एक वाहन टाटा योध्दा पिक अप क्र. MH40BL1138 हि भरधाव वेगाने कामठी हद्दित जात होती. सदर वाहनाचा पाठलाग करुन वाहन रंगारी ढाबा समोरच हायवे रोडावर पकडले. वाहनात १२ गौंवश जनावरे निर्दतेने कोंबुन कत्तली करीता घेवून जात होती.सदरील वाहनाचा चालक नामे मेहबूब अकबर पठाण वय ३२ रा. हाॅकी बिल्डींग कामठी व क्लिनर नामे मोबीन मतीन खान वय २४ रा.कोळसाटाल कामठी यास अटक करण्यात आले. सदर आरोपी कडुन जनावरे व वाहन सह ४,३६,०००/- माल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *