दुचाकी अपघातात अॅक्टीव्हा चालक भुषण तांडेकरचा मृत्यु

कन्हान ता.प्र.दी.८ : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महा मार्गावर वाघोली शिवारात दोन दुचाकी चा अपघात होऊन होंडा अॅक्टीव्हा चाल क भुषण तांडेकर चा घटनास्थळीच मृत्यु झाला.
गुरूवार (दि.९) जुलै ला दुपारी ३. ३० वाजता दरम्यान नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर वाघोली शिवारात मनसर कडुन हिरो होंडा क्र एम एच ४० बी वाय ७१५६ ने चालक मुलचंद रामचंद वरखडे वय ३८ वर्ष रा बानोर ता मौदा येत असताना कन्हान कडुन तेलनखेडी ला अॅक्टीव्हा क्र एम एच ४० बी एच ९२१९ ने चालक भुषण हुमेश्वर तांडेकर वय २८ वर्ष रा तेलनखे डी ता पारशिवनी व मागे स्वार उमेश पुरणदास तांडेकर वय ३७ वर्ष रा संता जी नगर कांद्री कन्हान जात असताना महामार्ग दुरूस्ती काम सुरू असल्याने एम एच के पेट्रोल पंप पासुन एकाकडी ल रस्ता बंद करून दुस-या दोन पदरी रस्त्याने वाहतुक सुरू असल्याने सामोरू न येणारी हिपो होंडा दुचाकी एकाएक अॅक्टीव्हा चालकास दिसल्याने झालेल्या दुचाकी अपघातात खाली पडुन चालक भुषण तांडेकरचा घटनास्थळीच मृत्यु झाला. मागे स्वार उमेश तांडेकर व हिरो होंडा चालक मुलचंद वरखडे किरकोळ जख्मी झाले. माहीती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहचुन भुषण तांडे कर ला जे एन दवाखाना कांद्री ला पाठ विले असता डॉक्टरानी मृत असल्याचे सांगितल्याने ग्रामिण उपजिल्हा रूग्णाल य कामठी येथे शवविच्छेदन करण्यात आले. कन्हान पोलीसानी कलम २७९, ३०४(अ) भादंवि, १८४ मोवाका नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास बीट जमादार नरेश वरखडे करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *