अत्याचारग्रस्त पिढीतेच्या मदतीसाठी प्रियंका फाउंडेशन सरसावले व्हिलचेअर व खाण्यापिण्या साहित्याची केली व्यवस्था गतिमंद व अपंग नाबालिक मुलीला मिळाला दिलासा

खापरखेडा ता.प्र. चिचोली:- (खापरखेडा) चौरेबाबा मडी परिसरात राहणाऱ्या अल्पसंख्याक असहाय्य गतिमंद व अपंग नाबालिक मुलीवर विकृत मानसिकतेने ग्रासलेल्या नराधमाने अत्याचार केला माणुसकीला काळिमा फासणारी घटना २८ जून रोजी घडली त्यामुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले अखेर प्रियंका फाउंडेशन पिढीतेच्या मदतीसाठी सरसावले पिढीतेला व्हिलचेअर भेट दिली शिवाय खाण्यापिण्या साहित्याची व्यवस्था करून दिली त्यामुळे पिढीतेला व तिच्या कुटुंबियांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
२८ जून रविवारला दुपारच्या सुमारास चिचोली वार्ड क्रमांक १ चौरेबाबा मडी परिसरात पिढीतेच्या घरा शेजारी राहणाऱ्या जाकीर हुसेन सकूर दुधकनोज नावाच्या ५५ वर्षीय नराधमांने पिढीतेवर अत्याचार केला यावेळी घरात अर्धांग वायूच्या आजाराने ग्रासलेल्या पिढीतेच्या वडिलां व्यतिरिक्त घरात कोण्हीही नव्हते बाजारातून घरी परत आलेल्या भावाला असहाय्य बहिणीवर अत्याचार केल्याचे दिसून आले त्यामुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले सदर कृत्याचे पडसाद संपूर्ण खापरखेडा शहरात उमटले लोकांच्या तीव्र भावना उमटल्या अत्याचारग्रस्त पिढीत छोट्याशा टिनाच्या घरात अर्धांगवायूने ग्रासलेले वडील व भावासोबत राहते तिच्या घरची परिस्थिती बेताची कुटुंबाचा गाडा भाऊ मोलमजुरी करून चालवितो कधी काळी हाताला काम धंदा नसतो त्यामुळे घरात अठरा विश्वे दारिद्र अखेर खापरखेडा परिसरात कार्यरत असलेलं प्रियंका फाउंडेशन पिढीतेच्या मदतीसाठी सरसावले १० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली पिढीतेसाठी व्हीलचेअर व खाण्यापिण्याचे साहित्य ९ जुलै गुरुवारला कउपलब्ध करून दिले व्हिलचेअर बघताच पिढीता जाम खुश होती तिला व्हीलचेअरवर फिरवित आले यावेळी तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता जणूकाही तिला एखादे खेळासाठी खेळणे मिळाले असे जाणवत होते याप्रसंगी प्रियंका फाउंडेशनचे अध्यक्ष अमर जैन पूर्व सरपंच धनराज डेअरिया सामाजिक कार्यकर्ता अजय सहारे, सुनिल जालंदर, अभय मिश्रा, सचिन व पिढीतेचा भाऊ उपस्थित होते.
असहाय्य पिढीतांसाठी मदतीसाठी प्रियंका फाउंडेशन
चार वर्षांपूर्वी एकतर्फी प्रेमातून प्रियंका नावाच्या महाविद्यालयीन तरुणीची हत्या झाली सदर घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले सर्वसामान्य नागरीकांनी ती बरी व्हावी म्हणून वर्गणी गोळा केली मात्र घटनेच्या चौथ्या दिवशी तिने मृत्यूला कवटाळले शिल्लक वर्गणी संस्थेत मुदतठेव करण्यात आली सदर रकमेतून पिढीतांची मदत करण्यात येत असल्याचे प्रियंका फाउंडेशनचे अध्यक्ष अमर जैन यांनी सांगितले मात्र सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन शासनाने पिढीतेच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी अमर जैन व अजय सहारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *