आदासा येथे पर्यटकांसाठी इको-टुरिझम केंद्राची भर

दिनांक ०७:- जुलै, २०२० रोजी मा.ना.श्री. सुनील केदार, मंत्री (पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण), महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते नागपूर वनविभागाचे कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील आदासा नियतक्षेत्र वनमहोत्सवाचे औचित्य साधुन वृक्षारोपण कार्यक्रमाचे वृक्ष लागवड करून उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावित रोपवन हे “पंचवटी” संकल्पनेवर आधारित आहे. पंचवटी उद्यान हे नाशिक जिल्ह्यात वसलेले असून या ठिकाणी वनवासाच्या काळात काही काळ प्रभु श्री रामचंद्र यांचे वास्तव्य होते. हे ठिकाण रामायणामध्ये सीताहरण यासाठी प्रसिध्द आहे. त्याकाळी ऋषी भारद्वाज यांनी भगवान श्रीराम यांना या ठिकाणी त्यांनी वड, पीपल, अंजीर, बेल आणि आवळा या 5 वृक्षांची लागवड करावी असे सुचविले होते म्हणून त्याचे नांव पंचवटी असे आहे. याधर्तीवर कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील आदासा येथे याच 5 वृक्षांची लागवड मा. मंत्री महोदयांचे हस्ते करण्यात आले. लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रात ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली असून निसर्ग पाऊलवाट, पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था इत्यादीसह सुरक्षेच्या दृष्टीने चेनलिंक फेनसिंगचे नियोजन करण्यात येत आहे. उद्यानात एक मचान प्रस्तावित करण्यात आलेली असून तेथून आदासा गणेश मंदिराचे गर्भगृहात बसलेल्या भगवान श्री गणेश थेट दिसतात. जैवविविधता उद्यान हा आदासा इको-टुरिझम योजनेचा एक घटक असून निर्वाचन केंद्र, जैवविविधता उद्यान, अॅडव्हेंचर पार्क, निसर्ग पाऊल वाट आणि निसर्ग निर्वाचन केंद्राचे कामे 2017 मध्ये पूर्ण झाले आहे. मागील वर्षी निसर्ग निर्वाचन केंद्रामध्ये प्रदर्शनीची 1.50 कोटी रुपयांची कामे करण्याकरीता जिल्हा योजनेमधुन (DPDC) प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. आदासा भगवान श्री गणेशासाठी प्रसिद्ध असल्याने निसर्ग निर्वाचन केंद्रातील मुख्य संकल्पना गज (हत्तीवर) आधारित आहे.
या केंद्रामध्ये निसर्गाचा परिचय, जोपासना, अधिवास, आणि त्यांचे संवर्धन या विषयांसाठी 6 कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. पर्यावरण व परिवर्तन मंत्रालयाचे अधिनस्त असलेले अहमदाबाद येथील पर्यावरण शिक्षण केंद्रातील तज्ञामार्फत प्रदर्शनीचे काम करण्यात येणार आहे. आदासा मंदिर जैवविविधता उद्यानाशी नैसर्गिक मार्गाद्वारे जोडण्यात येणार असून या इको-टुरिझम योजनेचा उद्देश नागपूरातील नागरिकांना/निसर्ग प्रेमींना पर्यायी पर्यटन स्थळ उपलब्ध करून देणे आहे. या क्षेत्राचा निसर्ग शिक्षण केंद्र म्हणून विकास करणे आणि स्थानिक समितीसाठी उपजीविका निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी इको-टुरिझम क्षेत्र स्थानिक बचत गट आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती, आदासा मार्फत चालविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *