कन्हानला स्वच्छता गृह व बाजारच्या जागेच्या अभावाने नागरिक त्रस्त

कन्हान ता.प्र.दी.५ जुलै : – ग्राम पंचायतीचे नगरपरिषदे त रूपांतर होऊन सुध्दा कन्हान नगरपरि षेद अंतर्गत महामार्गावर एकही स्वच्छता गृह नसुन गुजरी व आठवडी बाजाराची स्थायी जागा नसल्याने महामार्गावरच बाजार भरतो. या दैनदिनी अत्यंत आव श्यक समस्या त्वरित सोडविण्याची मागणी नागरिकांनी शासन दरबारी केली आहे.
महाराष्ट्राची क्रमाकं २ ची ग्राम पंचा यत कन्हान-पिपरी राज्य, देश, विदेशात उद्योगनगरी म्हणुन नावलौकिक प्राप्त होती. येथील उद्योगपती श्रीरामप्रसादजी खण्डेलवाल हयाना भारत सरकार व्दारे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. अश्या ग्राम पंचायतीची वाढती लोंकसं ख्या व विकासाच्या दुष्टीने नगरपरिषदेत रूपांतर करण्यात आले. परंतु आजही बहुतेक अंत्यत महत्वाच्या समस्या जसे नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या मध्यतंरी काश्मीर ते कन्याकुमारी ला जोडणारा चारपदरी राष्ट्रीय महामार्ग असुन शहरात या महामार्गावर एकही स्वच्छका गृह नाही. गुजरी व आठवडी बाजाराची स्थायी जागा व व्यवस्था नसल्याने दैनदिनी गुजरी व आठवडी बाजार हा महामार्गावरच भरतो. यामुळे एखाद्या मोठया अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. स्मश्यानभुमीची जागा नगर परिषदे कडे नसुन स्मशान घाट सुध्दा नसल्याने नगरवासीयाना काम़ठी क्षेत्रा त कन्हान नदीच्या किना-यावर मृतदेहा चा अंतिम संस्कार करावा लागतो. यास्तव कन्हान नगरपरिषदेत नागपुर महानगर पालिकाचे विद्यमान आयुक्त तुकाराम मुंढे सारखे कर्तव्यदक्ष, सक्षम अधिकारी ची नियुक्ती करून कन्हान नगरपरिषद क्षेत्राचा अंत्यत आवश्यक दैनदिनी गरजाची पुर्तता आणि शहराचा सर्वागिन उन्नती, विकास साधता यावा. अशी मागणी मा.उद्ववजी ठाकरे मुख्यमं त्री महाराष्ट्र राज्य हयाना निवेदन पाठवुन चेतन मेश्राम, चरण मोटघरे, नरेश सोनेकर, सुरेश खेरगडे, मनोज गोंडाणे, संदीप शेंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *