भंगार प्रकरणाची सारवासारव करण्यास ठाणेदारांची धावपळ

कन्हान ता.प्र.दी.५ जुलै : – पोलीस ठाण्यातील जप्त मुद्दे माल (भंगार) प्रकरण अंगावर येताना दिसताच ठाणेदार अरुण त्रिपाठी आता प्रकरणाची सारवासारव करण्याच्या प्रय त्नात असल्याने वरिष्ट अधिका-यांनी संबधितावर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन व वेळेप्रसंगी न्यायालयात लढाई लढण्याचा मानस श्री भिमटे यांनी व्यकत केला .
कन्हान पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी विविध गुन्ह यात जप्त केला मुद्देमाल भंगार स्वरूपा त कित्येक महिन्यापासुन पडलेले होते. (दि.२८) जुन ला सदर मुद्देमाल एका मिनी ट्रक क्र एम एच ४३ ए डी २१६७ मध्ये बाहेर पाठवले. ते मुद्देमालचे भंगार वजन करण्यासाठी धर्म काट्यावर पाठ विल्याची आरोळी ठाणेदार अरुण त्रिपा ठी कितीही देत असले तरी भंगार प्रकर ण संशयातीत आहे. या बाबतीत मला माहीत नाही, माहिती घेऊन सांगतो, मुद्दे माल भंगाराची अडचण होती म्हणून मा गे टाकणार होतो, सगळे भंगार कुजलेले सडलेले होते, अशी उत्तरे देऊन स्थानिक पत्रकारांची बोळवण केली. ठाणेदार त्रिपाठी यांनी सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तरी उचलून नेलेले जप्त मुद्देमालाचे भंगार परत त्याच ठिकाणी का टाकण्यात आले, भंगार बाहेर पाठव ताना कुठलेही कायद्याशीर प्रक्रियेचा अवलंबन का केले नाही ? भरदिवसा एक मिनि ट्रक ठाण्यातील जप्त मुद्देमाल भंगार स्वरूपात भरून जात असताना ठानेदाराला कसे काय माहीत नाही, इत्यादी प्रश्नाचा उलगडा होणे आवश्यक आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी सदर प्रकरणाची वरिष्ठाकडे तक्रार दाखल केल्यानंतर क न्हान ठाण्यातील भंगार कथा कायद्याच्या चौकटीत बसविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. याची परिणीती म्हणजे उप विभागीय अधिकारी (एसडीओ) रामटेक कडून भंगार विकण्याची परवानगी एक जुलै २०२० ला कन्हान पोलीस स्टेशन कडून मागण्यात आली आहे. ती अद्दया प मिळाली नाही. सुमारे पाच टन असले ल्या जप्त मुद्देमालात तांब्याच्या अनेक विद्युत मोटारी, कोळसा खानीतील दाते असलेले मोठीं चाकं, तार, लोंखडी सामा न या वरुन या भंगाराची मुल्यकसोटी तपासता येवू शकते. अनेक प्रसार माध्य मांनी बातमी प्रसारित करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली बोटचेपी भुमिका संशयात भर टाकणारी आहे. संबंधिता वर योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा व प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याचा मानस श्री. भिमटे यांनी प्रस्तुत वार्ताहराशी बोलताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *