कामठी ता.प्र.दी ५जुलै:- नागपुर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवर विख्यात कामठी येथील ड्रैगन पैलेस टेंपल येथे आषाढ पोर्णिमा व वर्षावास निमित्ताने विशेष बुद्धवंदना चे आयोजन करण्यात आले होते. लाँक डाऊन मध्ये सध्या बौद्ध विहार बंद आहेत. परंतु फिजिकल डिस्टेंसिंग चे पालन करुन ड्रैगन पैलेस टेंपल येथे नियमित पणे होणारी बुद्ध वंदना घेण्यात येते. आज सकाळी विशेष बुद्धवंदना करिता उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथील आदरणीय भंतेजी महाथेरो महेंद्र हे उपस्थित होते.
ड्रैगन पैलेस टेंपल च्या शिल्पकार अँड. सुलेखाताई कुंभारे व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष बुद्धवंदनेकरिता प्रामुख्याने उपस्थिती
याप्रसंगी गुरु पौर्णिमा चे निमित्ताने ड्रैगन पैलेस टेंपल च्या विशेष बुद्धवंदना मध्ये ड्रैगन पैलेस टेंपल च्या शिल्पकार अँड. सुलेखाताई कुंभारे व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रामुख्याने सहभागी झाले होते. चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी ड्रैगन पैलेस टेंपल च्या विशेष बुद्धवंदना मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन बावनकुळे यांनी केले.
विशेष बुद्धवंदना नंतर आदरणीय भंतेजी महाथेरो महेंद्र यांना अँड. सुलेखाताई कुंभारे तथा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चीवरदान तसेच भेटवस्तू देऊन भंतेजींचा आशिर्वाद प्राप्त केला. यावेळी नलिनी ताई कुंभारे, सुकेशिनी मुरारकर, भीमराव फुसे,नितीन गजभिये तसेच ओगावा सोसायटी चे पदाधिकारी व ड्रैगन पैलेस टेंपल चे काही मोजकेच कर्मचारी उपस्थित होते.