कन्हान नगरपरिषदेत शंकर चहांदे स्विकृत सदस्य पद्दी निवड

कन्हान ता.प्र.दी ३ : – नगराध्यक्षा व १७ नगरसेव कांच्या नगरपरिषद कन्हान-पिपरी येथे दोन नामनिर्देशित सदस्याची निवड कर ण्यात येते. तांत्रिक अडचणीमुळे एक नामनिर्देशित सदस्य पद प्रलंबित होते. यास्तव माजी नगराध्यक्ष शंकर चंहादे यांची नामनिर्देशित सदस्य पद्दी निवड करण्यात आली.
कन्हान-पिपरी ग्राम पंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर होऊन दि.९ जानेवारी २०२० ला झालेल्या निवडणुकीत शिवसे नेच्या करूणाताई नगराध्यक्षा व तीन नग रसेवक, कॉग्रेसचे- ७ , भाजप चे- ६ व प्र हारचे अपक्ष-१ नगरसेवक निवडुन आले . दि २१ फेब्रुवारी २०२० ला नगरपरिषदे त मा जिल्हाधिकारी यांनी शिवसेना गटा चे शैलेष दिवे कमी सदस्य संख्येने तर भाजप गट चे शंकर चंहा़दे यांचे तांत्रिक चुकामुळे नामनिर्देशित अर्ज रद्द केल्याने कॉग्रेस गटाचे नरेश बर्वे ला नामनिर्देशित सदस्य पद्दी निवड करण्यात आले होते.
मा. रविंद्र ठाकरे जिल्हाधिकारी नागपुर यांच्या दि २ जुलैै २०२० च्या पत्रान्वये पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा करूणा ताई आष्टणकर हयांनी शुक्रवार (दि.३) सभा घेऊन भाजपा कन्हान नगर विका स आघाडी गटाचे शंकर चंहादे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणुन निवड केली. यावेळी नगराध्यक्षा करूणाताई आष्टण कर, उपाध्यक्ष योगेंद्र रंगारी, मुख्याधिका री संदीप चिंद्रेवार, विरोधी गट नेते राजेंद्र शेंदरे, नगरसेवक राजेश यादव, मनिष भिवगडे, अनिल ठाकरे, डॅनियल शेंडे, विनय यादव नगरसेविका सुषमा चोपक र, अनिता पाटील, कल्पना नितनवरे, गुंफा तिडके, पुष्पा कावडकर, संगिता खोब्रागडे, वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, रेखा टोहणे, मोनिका पौनिकर आदीने पुष्पगुच्छ देऊन शंकर चंहादे चे अभिनंद न केले.
भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांनी केले अभिनंदन
कन्हान नगरपरिषदचे नामनिर्देशित सदस्य म्हणुन माजी नगराध्यक्ष शंकर चंहादे यांची निवड झाल्याने भाजपा पदा धिकारी, सदस्य, सहकार्यात नवचैतन्य निर्माण होऊन हर्ष व्यकत करित शंकर चंहादे ना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी माजी उपाध्यक्ष मनोहर पाठक, महामंत्री सुनिल लाडेकर, मनोज कुरडकर, अजय लोंढे, प्रसिध्दी प्रमुख ऋृषभ बावनकर, अमन घोडेस्वार, संजय रंगारी, नगरसेविका संगीता खोब्रागडे, अनिता पाटील, सुषमा चोपकर, वंदना कुरडकर, वर्षा लोंढे आदी सह भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *