अनधिकृत रित्या भंगार विकणाऱ्या ठाणेदाराला निलंबित करा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षांची मांगणी.

कन्हान ता.प्र.दी.१: – ठाणेदारांनी कायदेशीर प्रकि येचे पालन न करता पोलीस ठाण्यातील जप्त भंगार मिनी ट्रक मध्ये भरून बाहेर पाठविल्याचा प्रताप नागरिकांच्या लक्षात येताच नेलेले भंगार परत बोलविले त्या मुळे ठाणेदाराच्या कार्य प्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन ठाणेदार अरू ण त्रिपाठी यांना निलंबित करण्याची मा गणी राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी वरिष्ट अधिका-या ना निवेदन देऊन केली आहे.
गेल्या अनेक वर्षांन पासुन कन्हान पोलीस स्टेशन आवारात विविध गुण्यानं मध्ये जप्त केलेले भंगार पडून होते ते भंगार कुठलेही कायद्याशीर प्रक्रियेचा अवलंब न करता सोमवार दि.२९ जुन ला एका कबाडी व्यवसायाला परस्पर विकण्यात आला. स्थानिक पत्रकारांनी यांची विचारपुस करून प्रकरण उघड केल्याने याची वार्ता परिसरात पसरताच ठाणेदार अरूण त्रिपाठी यांनी सदर मिनी ट्रक क्र एम एच ४३ ए डी २१६७ ला परत ठाण्यात बोलावुन भंगार खाली केले. सदर ठाणेदाराला कायद्याचे ज्ञान असुनही बेकायद्देशीर रित्या भंगार विक ण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाणेदारा ला निलंबित करण्यात यावे, यापूर्वी कन्हान चे ठाणेदार अरुण त्रिपाठी हे ज्या ज्या ठिकाणी पदस्त होते त्या त्या ठिकाणी असाच प्रकारे भ्रष्टाचार झाला असावा, या अधिकाऱ्याची अपराधिक वृत्तीची मानसिकता असल्यामुळे व अनेक प्रक रणात गैरव्यवहार केल्यामुळे कन्हानचे ठाणेदार अरुण त्रिपाठी यांची विभागीय चौकशी करून त्यांची चलअचल संपत्ती जप्त करण्यात यावी व ठाणेदार त्रिपाठी यांच्या कन्हानच्या कार्यकाळातील जप्त मालाची चौकशी करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र पोलीस विभागाची प्रतिमा मलि न करण्याऱ्या ठाणेदाराला निलंबित कर ण्यात यावे अशी मांगणी उपविभागिय पोलीस अधिकारी कामठी विभाग यांच्या शी राष्ट्रवादी नागपूर जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *