वारकऱ्यांच्या वेशात विठुरायाचे दर्शन राज्याच्या काेराेना मुक्तीसाठी घातले देशमुखांनी साकडे

नागपूर जि.प्र.दी.२८:- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारकèयांच्या वेशात आज पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राला काेराेनापासून मुक्तीसाठी विठुरायाकडे साकडे घातले.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी वारकèयांच्या सुरक्षेसाठी केलेल्या उपाययाेजनांची माहिती घेतली. कैक शतकापासून सुरू असलेली ही परंपरा कायम राहावी, अशी कामनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख वारकèयांच्या वेशात हाेते. गळ्यात तुळशीचा हार व हातात वीणा घेऊन त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे आराेग्यमंत्री राजेश टाेपे, साेलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके उपस्थित हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *