सावनेर ता.प्र.दी.२८:-सावनेर पासून अवघ्या 15 की मी अंतरावर असलेल्या नवनाथ आश्रमात लॉक डाऊन मुळे येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली झाली आहे निसर्गाने आपल्या सौन्दर्याची मुक्तपणे उधळण केलेल्या या परिसरात जून जुलै महिन्यात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर रहात असे पण यावेळी मात्र कोरोना संकटामुळे भाविक येताना दिसत नाही कोलार धरणाचा विस्तीर्ण जलाशय सभोवताल विविध प्रकारचे वृक्ष वल्ली मंदिरात उभा असलेला वटवृक्ष दत्त मंदिर नवनाथ मंदिर आणि धरणाच्या काठावर असलेले गजानन मंदिर यामुळे या परिसराला सौन्दर्य प्राप्त झाले आहे दरवर्षी या आश्रमात विविध धर्मीक कार्यक्रम साजरे केले जाते या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविक आपली हजेरी लावतात तसेच निसर्ग प्रेमी पक्षी प्रेमी या परिसरात मोठ्या संख्येने येत असतात (व्हिडीओ आहे)