वंचित बहुजन आघाडीचे उर्जा मंत्र्यांना निवेदन विज बिल माफ़ करा अन्यथा आंदोलन

खापरखेडा-प्रतिनिधी
लॉक डाऊन काळात महावितरण कंपनीने वीज वापराचे वारेमाप बिल पाठविले आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून हवालदिल झाले आहेत त्यामुळे लॉक डाऊन काळातील बिल माफ करण्यात यावे यासंदर्भातील निवेदन उर्जामंत्र्याना तहसीलदार यांच्या माध्यमातून दिले असून आंदोलनाचा ईशारा दिला आहे
संपूर्ण जगाला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे त्यामुळे मागील तीन महिने देशासह राज्यात लॉक डाऊन सुरू आहे देशाची व राज्याची अर्थव्यवस्था डबघाईस निघाल्याने काही प्रमाणात लॉक डाऊन शिथिल करण्यात आले आहे मात्र मागील तीन महिन्यापासून शेतकरी, मजूर, सर्व सामान्य नागरिक आपल्या घराबाहेर पडले नाहीत शिवाय रोजगार मिळत नसल्यामूळे मजुरांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले मात्र राज्यात कार्यरत महावितरण कंपनीने तीन महिन्याचे थकीत विजेचे बीज पाठवून मीठ चोळण्याचे काम केले आहे मागील तीन महिन्यापासून रोजगार नसल्यामुळे बिल भरावे कसे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकां समोर निर्माण झाला आहे त्यामुळे लॉकडाउन काळातील विज वापराचे वारेमाप विजबिल पाठविणाऱ्या महावितरण कंपनीच्या कृत्याचा वंचित बहुजन आघाडी तालुका सावनेर तर्फे निषेध करण्यात आला आहे कोरोना महामारीमुळे महावितरण कंपनीने लॉकडाउन काळातील विज बिल माफ़ करून सर्वसामान्य नागरिक, मजूर, शेतकरी, वंचित समुहाला दिलासा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र शासन व उर्जामंत्रालय यांच्याकडे करण्यात आली असून यासंदर्भातील निवेदन २५ जून गुरुवारला तहसीलदार दिपक कंरडे यांना जिल्हा उपाध्यक्ष नागपूर ग्रामिण अजय सहारे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले असून अन्यथा वंचित बहुजन आघाडी जिल्हास्तरीय आक्रमक आंदोलन करेल हा ईशारा देण्यात आला याप्रसंगी तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, दादाराव लांजेवार, आनंद बागडे, राजेंद्र मेश्राम, अश्विन कापसे, शांताराम ढोके, सतीश झोडापे, धनंजय दुपट्टे, कमलेश सहारे, सचिन खंडारे, कुणाल रामटेके आदि उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *