राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

काटोल प्रतिनिधी २५ जून:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचेवर अश्लाघ्य भाषेत आमदार गोपीचंद पडाळकर यांनी टीका केल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी गणेश चन्ने, चंद्रशेखर चिखले, अनुप खराडे, तारकेश्वर शेळके, अजय लाडसे, गणेश सावरकर, दिलीप घारड, प्रविण गोतमारे, अमित शेरकर, मुन्ना पटेल, कल्पना गोमासे, अयुब पठाण, अमित काकडे, प्रशांत साठोणे, नितीन वानखेडे, हरिश्चंद्र नाईक, धिरेंद्र सोनटक्के, संदीप येवले, गणेश केला, राजु भस्मे, डॉ जितेंद्र कोतेवार, रुपेश नाखले, रवि असरेट, प्रदीप वंजारी, चंद्रशेखर आंबटकर, अशोक ठाकरे, श्रीकांत (बापु) आरघोडे, रवि नव्हाल, संजय डांगोरे, वैशाली डांगोरे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नुसती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळख नसुन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर एक नाव आहे राजकीय व सामाजिक वर्तुळात लोकनेता म्हणून ओळखले जाते ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता जनसामान्यांसाठी लढणारा योद्धा शरद पवार यांच्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांची लायकी नसताना त्यांनी जे अश्लाघ्य भाषेत टिका टिप्पणी केली ती अतिशय निंदनीय आहे तसेच कोरोना अंतर्गतसुद्धा शरद पवार यांचेवर टिकाटिप्पणी केली त्यामुळे त्याचेवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी काटोल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे 

One thought on “राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *