पडळकरांचे वक्तव्य निषेधार्थ – सलिल देशमुख

नागपुर दि.२५ :- भाजपचे आमदार गाेपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य केवळ निषेधार्ह नव्हे तर हीन पातळीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व जि. प. सदस्य सलिल देशमुख यांनी व्यक्त केले. परावलंबी आमदार पडळकर यांनी स्वयंभू नेते शरद पवार यांच्यावर बाेलू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदार पडळकर यांना शरद पवार यांच्यावर बाेलण्याचा नैतिक अधिकार नाही. शरद पवार यांचे याेगदान सागळ्या देशाला माहिती आहे. आमदार पडळकर सध्या भाजपच्या खांद्यावर बसून राजकारण करीत आहे. शरद पवार हे स्वयंभू नेतृत्व आहे. त्यांनी महाराष्ट्र व देशाच्या विकासाला दिलेले याेगदान कुणीही विसरू शकत नाही. याची जाणिव आमदार पडळकर यांनी ठेवावी, असेही सलिल देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *