काटाेल व नरखेड तालुक्यातील सिंचन प्रकल्पांना चालना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली आढावा बैठक

नागापूर- काटाेल ता.प्र. दी.२५:- नरखेड तालुक्यातील अनेक वर्षांपासून रेंगाळलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणयासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उच्चस्तरिय बैठक घेऊन त्वरित पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. यामुळे हे दाेन्ही तालुके सुजलाम सु\लाम हाेण्याच्या दिशेने भक्कम पाऊल पडले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्हीडीओ काॅन्\रसिंगद्वारे उच्च अधिकाèयांची बैठक घेतली. यात या दाेन्ही तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या भागातील सिंचन प्रकल्पाची सद्यस्थिती मांडली. यावेळी 1. कन्हान वळण याेाजना, 2. वैनगंगा व नळगंगा नदी जाेड प्रकल्प, 3. थडीपवनी उपसा सिंचना याेजना व 4. जाम प्रकल्प पूर्ण करण्यात येत असलेल्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. हे सर्व प्रकल्प काटाेल-नरखेड तालुक्याच्या विकासासाठी त्वरित हाेण्याची आवश्यकता असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले..
युद्धपातळीवर कामे करा
कन्हान वळण याेजनेमध्ये काटाेल व सावनेर विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश हाेताे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास 15 टीएमसी पाणी उपलब्ध हाेणार आहे. नरखेड तालुक्यातील 9 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. काेची बॅरेजमधून नागपूर शहरालाही पाणी उपलब्ध हाेणार आहे. ार थाेडे काम शिल्लक राहिलेले असल्याने युद्धपातळीवर हा प्रकल्प पूर्ण करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. हा प्रकल्प एक वर्षात पूर्ण हाेईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. याप्रकल्पामध्ये येत असलेल्या अडचणी प्रशासनाने त्वरित पूर्ण कराव्या, असे निर्देशही त्यांनी दिले.
साेीयाचे पाणी वापरण्यास मंजुरी
थडीपवनी उपसा सिंचन प्रकल्पासाठी साेि\या प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याचा वापर करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्र्यांनी अधिकाèयांना दिले. अमरावती जिल्ह्यातील साेीया प्रकल्पासाठी 87 दलघमी पाणी मंजूर झाले हाेते परंतु साेीया प्रकल्पाने 27 दलघमी पाण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केल्याने हे अतिरिक्त पाणी थडीपवनी उपसा सिंचन प्रकल्प करण्यासाठी वापरावे.या संदर्भात तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा, असेही पाटील यांनी निर्देश दिले. या प्रकल्पामुळे 10 गावांना पाणी उपलब्ध हाेणार असून जवळपास 5 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.
खरबडी बांधाची रुंदी वाढविणार
खरबडी प्रकल्पाच्या बांधाची रुंदी वाढविण्याचे मान्य करण्यात आले. खरबडी प्रकल्पातील शेतकèयांच्या जमिनी अमरावती जिल्ह्यात असल्याने या गावातील शेतकèयांना शेती करण्यासाठी जात येत नाही. या बांधात पाणी राहत असल्याने बांधावरून जाण्याशिवाय शेतकèयांना पर्याय नाही. यासाठी या खरबडी बांधाची रुंदी वाढविण्याची आवश्यकात आहे. यामुळे शेतकèयांना ये-जा करणे सुकर हाेेईल. यासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. ही मागणी जलसंपदा मंत्र्यांनी मान्य केली.
कार प्रकल्पाला निधी मंजूर
कार प्रकल्पाचा जलसेतू करण्यासाठी 47 काेटी रुपयांच्या निधीला यावेळी मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाची एकूण किंमत 352 काेटी रुपये आहे. या प्रकल्पातील लाेहारी सावंगी वितरीका पूर्ण करण्यासाठी केवळ 7 काेटी रुपयांची आवश्यकता आहे तर इतर कामे करण्यासाठी 40 काेटी रुपयांचा निधी हवा आहे. ही मागणीही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंजूर केली.
काेविड 19 मुळे निधीच्या उपलब्धतेसाठी काही अडचणी आहेत. ही अडचण दूर झाल्यानंतर हे सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण हाेईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
या बैठकीत जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाèयांसह, नागपूर जिल्हा परिषदेचे सदस्य शेखर काेल्हे, नरखेड पंचायत समितीचे माजी सभापती वसंत चांडक, नरखेड पंचायत समितीच्या सभापती साै. नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, जि.प. सदस्य समीर उमप, नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ंबंडाेपंत उमंरकर, नरखेडचे पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे, प्रवीण जाेध, पुरुषाेत्तम बाेडखे, नंदू माेवाडे, मनीष ुके, सतीश रेवतकर आदींनी या चर्चेत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *