मौदा ता प्र।मागील काही दिवसात मौदा तालुक्यात थोडफार पाऊस सुरू झाला आणि शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली त्यामुळे सर्वत्र शेत मशागतीच्या सुरवात झाली काही सधन शेतकरी यांत्रिकीकरण तर काही शेतकरी परंपरागत पद्धतीने मशागत करीत आहे धान मिरची कापूस सोयाबीन ही तालुक्यातील प्रमुख पिके आहेत त्यामुळे कंपास आणि सोयाबीन पिकाची पेरणी सुरू केली आहे तर अनेक शेतकऱ्यांनी टिपण पद्धतीने धान लागवड केली आहे तर अनेक शेतकऱ्यांनी धान परहे टाकले आहे असे शेतकरी समाधान कारक पावसाची प्रतीक्षा करीत आहे मजुरांची कमतरता लक्षात घेता अनेक सधन शेतकरी ट्रॅकटर च्या साह्याने पेरणीपूर्व मशागत करताना दिसत आहे त्यातच अनेक शेतकरी पीककर्ज मिळविण्याच्या दृष्टीने विविध बँकेत गर्दी करताना दिसून येत आहे एकंदरीत तालुक्यात खरीप हंगामाला सुरवात झाली आहे सर्वत्र हिरवेगार वातावरण निर्माण झाले असून पेर ते व्हा या पक्षाचा आवाज रानावनात घुमत आहे ।