एकाच दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांसह तीन पॉझिटिव्ह

कामठी, ता.२१ :- तालुक्यात एकाच दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांसह तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यात कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या गांधीनगर येथे रहात असलेला ३५ वर्षीय एका आरोग्य कर्मचाऱ्यांसह शहरालाच लागून असलेल्या येरखेडा येथील १९ वर्षीय  तरुणी तर कवठा येथील २८ वर्षीय एका युवकाला   कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे आज आलेल्या अहवालात स्पष्ट झाल्याने प्रशासनात खळबळ माजली असून या रुग्णांच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत याचा शोध घेतला जात आहे. तिन्ही रुग्णांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता तर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील आठ सदस्यांना पाचपावली तर २१ सदस्यांना नजीकच्या वारेगाव येथील कोविड सेंटर अश्या २९ जणांना कोरोंटाईन करण्यात आले असून रुग्ण राहात असलेला परिसराचे निर्जंतुकीकरण करून काही घरांचा परीसर  सील करण्यात आला आहे.
        सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करून नजर ठेवुन आहेत तरीसुद्धा तालुक्यातील ग्रामीण भागात या संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असताना दिसून येत आहे. नागपूरच्या मेडीकल शासकीय रुग्णालयात आरोग्य सेवक म्हणून कर्तव्यावर असलेल्या व कामठी शहरातील  गांधीनगर, कसाईपुरा येथे रहात असलेला ३५ वर्षीय आरोग्य कर्मचारी बाधीत रुग्णाच्या संपर्कात आल्याने मेडीकल हॉस्पीटल मध्ये स्वतःच्या घश्याचे तपासणी करून घेतली असता अहवालात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. शहराला लागून असलेल्या येरखेडा ग्रा. प. हद्दीत येणाऱ्या वार्ड क्र ४, रामकृष्ण ले आउट येथे राहात असलेली १९ वर्षीय तरुणी ही नागपूरच्या इंदोरा चौकातील एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता गेली असता संबंधित डॉक्टररांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार कोरोनाची तपासणी करून घेतली या तपासणी अहवालात सदर तरुणी कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले. ही बाधित तरुणी वारीसपुरा येथील वडिलांच्या किराणा दुकानात बसून हातभार लावत असे तेव्हा हिच्या संपर्कात आणखी किती व्यक्ती आले याचा अंदाज ही व्यक्त करता येत नाही. तर कवठा ग्रामपंचायत हद्दीतील गोविंदगढ येथील २८ वर्षीय युवकाचा अपघात झाल्याने मेडिकल मध्ये उपचार दरम्यान शस्त्रक्रिया करण्याकरिता तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे  निदर्शनास आले. हा युवक नागपूरच्या मोमीनपुरा येथील रहिवासी असून आठ दिवसांपूर्वी कवठा ग्रामपंचायत हद्दीतील गोविंदगढ येथे परिवारासह वास्तव्यास आला होता दरम्यान बुधवारी काही कामानिमित्त भंडारा येथे गेला असता त्याचा अपघात झाल्याने नागपूरच्या मेडीकल शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते.उपचार दरम्यान शस्त्रक्रिया करण्याकरिता तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे  निदर्शनास आले.एक एक करता तालुक्यातील या तिघांचाही अहवाल आज तालुका प्रशासनाला प्राप्त झाल्याने त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनात खळबळ माजली असून या रुग्णांच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत याचा शोध घेतला जात आहे. माहिती मिळताच तहसीलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी फुलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ शबनम खानुनी आपल्या पथकासह दाखल होऊन परिसराची पाहणी केली यातील दोघांना शासकीय मेडीकल मध्ये तर बाधीत तरुणीला नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचाराकरिता तर कवाठा येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील आठ सदस्यांना पाचपावली तर कामठी शहरातील गांधीनगर येथील १६, येरखेडा व वारीसपुरा येथील पाच सदस्यांना अश्या एकूण २१ सदस्यांना नजीकच्या वारेगाव येथील कोविड सेंटर मध्ये कोरोंटाईन करण्यात आले असून रुग्ण राहात असलेला परिसराचे निर्जंतुकीकरण करून काही घरांचा परीसर  सील करण्यात आला आहे. कामठी तालुक्यातील बाधीत रुग्णांचा आकडा १९ वर पोहोचला असून त्यापैकी दहा रुग्ण बरे झाले आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, सामाजिक अंतराचे पालन करणे, नियमित मास्क वापरून कोणतीही वस्तू खाण्यापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुणे तसेच प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *