प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना त्वरित अनुदान द्या.  …… जिल्हाधिकार्‍यांना  सुरेश भोयर यांचे निवेदन…

 

कामठी ता.प्र.दी.१७:-प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना त्वरित अनुदान द्या.  …… जिल्हाधिकार्‍यांना  सुरेश भोयर यांचे निवेदन…….. तालुका वार्ताहर कामठी …. कामठी  तालुका व कामठी  शहर अंतर्गत केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून 2020 पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घर देण्याची महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली होती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड स्वतःच्या मालकी हक्काची जागा वार्षिक उत्पन्न या निकषाच्या आधारावर करीत कृती आराखड्याची अंमलबजावणी संबंधित कार्यालय यंत्रणेद्वारे होत आहे कामठी शहर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 688 घरकुल मंजूर झालेले आहे त्यातून 355 घरकुलांचे काम सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून प्राप्त झालेला आहे त्यामध्ये काही लोकांचे बांधकाम स्लॅब पर्यंत तर काहींचे  अर्धवट बांधकाम होऊन केंद्रशासनाकडून येणाऱ्या उर्वरित निधीअभावी रखडले आहे पावसाळा तोंडावर असून आधीच  कोविड   90 च्या सतत तीन महिन्याच्या लॉक डाऊन मुळे आलेल्या बेरोजगारीमुळे आधीच हतबल झालेला  व पावसाळ्याआधी घराचे काम पूर्ण करण्यासाठी  निधीअभावी सावकाराच्या दारात सुद्धा घरकुल योजनेच्या लाभार्थी गेलेला आहे तरी त्याचे घरांचे बांधकाम अपूर्ण आहे त्याकरता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेतील  उर्वरित निधी लाभार्थ्यांना द्यावी या आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर यांनी जिल्हाधिकारी मार्फत शासनाला दिले आहे याप्रसंगी न प कामठी चे नगर सेवक काशिनाथ प्रधान नीरज लोणारे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *