लॉकडाउननंतर एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याची शक्यता

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेचेही तिकीट नाकारल्यानंतर खवळलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. योग्य व्यक्तींना विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी उघड केली होती.

एकनाथ खडसे पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसोबत विचार विनिमय करणार आहेत. आपल्यावर वारंवार अन्याय होत असून आपल्याला जाणूनबुजून बाजूला सारले जात आहे, आता तरी आपण निर्णय घ्या, अशी विनंती एकनाथ खडसे यांना कार्यकर्ते फोनवरुन करत असल्याची माहिती आहे. दरम्यान, विविध पक्षांकडून एकनाथ खडसे यांना पुन्हा ऑफर येत असल्याची चर्चा असल्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करण्याची शक्यता बळावली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *